Skip to main content

Posts

Marathi Women Entrepreneur Ketaki Joshi

 #महिला_उद्योजिका :२ #jfw Joshi Food Works  केतकी जोशी          प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योगासाठी आवश्यक असलेले गुण हे मूलतःच असतात. गरज असते ती आपली शक्यता ओळखून त्या दिशेने पाऊलं उचलायची. बऱ्याच जणींना हे जमत नाही. पण काही जणी मात्र आलेल्या अडचणींवर मात करत आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल उचलतात आणि यशस्वी देखील होतात, आज आपण अशाच एका उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत. जिने संसारिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून झाल्यावर आपली सेकंद इनिंग चालू केली आणि आज ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलीय.           केतकी जोशी आणि तिचे पती दोघेही इंजिनियर. आनंदी सुखवस्तू कुटुंब. राजाराणी चा संसार अगदी व्यवस्थित चालू असताना चाहूल लागली एका नवीन पाहुण्याची आणि मग मुलीच्या जन्मानंतर केतकी ताईंनी मुलीला सांभाळण्यासाठी नोकरी सोडली आणि गृहिणीपद स्वीकारलं.           मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर मात्र केतकी ताईंना आयडेंटिटी क्राईसेस सुरू झाले. मी कोण, माझं अस्तित्व काय, माझ्या शिक्षणाचा उपयोग काय...
Recent posts

Marathi Women Entrepreneurs Kiran Badhe

 #महिला_उद्योजिका: १ #समृद्धी_बचत_गट                              किरण बढे          प्रत्येक महिला ही एक आदर्श उद्योजिकाच असते. अनेकदा तिचं कौशल्य घरापुरतं मर्यादित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावं म्हणून उद्योजिका होण्याचं स्वप्न स्त्रियांनी प्रत्यक्षात आणायला हवं. आज अनेक जणी उद्योगाच्या क्षेत्रात पाय रोवून घट्ट उभ्या असल्या तरी अनेक जणी उंबरठय़ाशीच अडून आहेत. अशाच उद्योगिणींना उंबरठ्याच्या बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व शोधायला शिकवणाऱ्या किरण बढे या उद्योजिकेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.         प्रत्येकाच्याच आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो आणि मग आपलं आयुष्य ३६०° वळवतो. अशाच एका टर्निंग पॉईंट नी किरण ताईंना पूर्णतः बदलून टाकलं. मध्यमवर्गीय कुटुंब, बेताचीच परिस्थिती असलेल्या एका सामान्य कुटूंबात मध्यप्रदेश मधील एका छोट्याशा खेड्यात ताईंचा जन्म झाला. शिक्षणाचं महत्व माहीत असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करू...