#महिला_उद्योजिका :२ #jfw Joshi Food Works केतकी जोशी प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योगासाठी आवश्यक असलेले गुण हे मूलतःच असतात. गरज असते ती आपली शक्यता ओळखून त्या दिशेने पाऊलं उचलायची. बऱ्याच जणींना हे जमत नाही. पण काही जणी मात्र आलेल्या अडचणींवर मात करत आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल उचलतात आणि यशस्वी देखील होतात, आज आपण अशाच एका उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत. जिने संसारिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून झाल्यावर आपली सेकंद इनिंग चालू केली आणि आज ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलीय. केतकी जोशी आणि तिचे पती दोघेही इंजिनियर. आनंदी सुखवस्तू कुटुंब. राजाराणी चा संसार अगदी व्यवस्थित चालू असताना चाहूल लागली एका नवीन पाहुण्याची आणि मग मुलीच्या जन्मानंतर केतकी ताईंनी मुलीला सांभाळण्यासाठी नोकरी सोडली आणि गृहिणीपद स्वीकारलं. मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर मात्र केतकी ताईंना आयडेंटिटी क्राईसेस सुरू झाले. मी कोण, माझं अस्तित्व काय, माझ्या शिक्षणाचा उपयोग काय...